MLA प्रणिती शिंदे यांची मतमोजणी पूर्वी शंका ; शेवटचा पर्याय म्हणून भाजप……
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वाढलेले मतदान ही सुद्धा डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान निवडणुकी नंतर प्रथमच काँग्रेसच्या आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांसमोर बोलताना जनमत भाजपच्या बाजूने नाही म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीत ध्रुवीकरण केले पण लोक या गोष्टीला वैतागले आहेत, EVM बद्दल शंका असून शेवटचा पर्याय म्हणून सत्तेसाठी काहीही करू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे नेमक्या काय म्हणाल्या पहा हा व्हिडिओ