Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे राष्ट्रवादीला दणका ; दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 January 2026
in political
0
आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे राष्ट्रवादीला दणका ; दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ
0
SHARES
419
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे राष्ट्रवादीला दणका ; दिनेश घोडके यांच्या भाजपाला पाठिंब्यामुळे चार प्रभागांमध्ये वाढले बळ

सोलापूर : जय मातादी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन उभे करणारे दिनेश घोडके यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केल्याने भारतीय जनता पार्टीच्या चार प्रभागातील उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १३ सह प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.

दिनेश घोडके यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून जय मातादी प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणले आहे. दिनेश घोडके यांना प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी जय मातादी प्रतिष्ठानचे प्रमुख दिनेश घोडके यांना विश्वासात घेऊन आगामी काळात सकारात्मक विचार करण्याची हमी दिली. आणि उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेला शब्द प्रमाण मानून दिनेश घोडके यांनी या निवडणुकीतून माघार घेत भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला तसेच त्यांच्या समवेत प्रचारात सक्रिय झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १३ सह परिसरातील प्रभाग क्रमांक ९, १२ आणि १८ अशा चारही प्रभागांमध्ये दिनेश घोडके यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिनेश घोडके यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे जय मातादी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच दिनेश घोडके मित्रपरिवार भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. घोडके यांच्या या भूमिकेमुळे भाजपने निवडणुकीच्या स्पर्धेत विरोधकांना मागे खेचत एक पाऊल पुढे टाकले आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात बारकाईने लक्ष घालत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शतप्रतिशत भाजपमय करण्याचा चंग बांधलेला आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत असून उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रारंभी काहीसे नाराज झालेले भाजपाचे कार्यकर्ते आता मात्र प्रचारात जोरदार सक्रिय झालेले दिसून येत आहेत.

Tags: @Devendra kotheBJP
SendShareTweetSend
Previous Post

आम आदमी, भाजपमध्येच फाईट ; प्रभाग 14 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम कुठेही दिसेना

Next Post

प्रभाग 25 मध्ये धनुष्यबाण जोरात ; एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीकडून होतंय स्वागत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रभाग 25 मध्ये धनुष्यबाण जोरात ; एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीकडून होतंय स्वागत

प्रभाग 25 मध्ये धनुष्यबाण जोरात ; एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीकडून होतंय स्वागत

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981426
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group