Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट ; या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2024
in political
0
आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट ; या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा
0
SHARES
528
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट ; या महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा

सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत चर्चा केली.

शहर मध्य विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणीपुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली. दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिल्या. स्मार्ट सिटीची कामे, शहरातील कचरा, पाणी व्यवस्थापन, विद्युत व्यवस्थापन, स्वच्छता आदी विषयांवर उपाय योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांना आश्वस्त केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्काळ सोडवल्या जातील, असे आश्वासन महापालिका आयुक्त शितल तेली -उगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना याप्रसंगी दिले.

याप्रसंगी भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उपस्थित होते.

सोलापूरही आता थांबणार नाही

मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे. त्यांचा विकासाचा महासंकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही योगदान देण्यास कटीबद्ध असून सोलापूरही आता विकासाच्या बाबतीत थांबणार नाही, हे वचन आम्ही सोलापूरकरांना देत आहोत.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य विधानसभा

Tags: MLA Devendra kotheShital teli ugaleSolapur SMC
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरकरांनो ! 31 st च्या रात्री सोलापुरातील वाईन शॉप आणि बार चालू राहणार या वेळेपर्यंत

Next Post

सोलापूरात तीन डीसीपी, चार एसीपी यांच्या नेतृत्वात 800 पोलिसांचा ताफा राहणार तैनात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरात तीन डीसीपी, चार एसीपी यांच्या नेतृत्वात 800 पोलिसांचा ताफा राहणार तैनात

सोलापूरात तीन डीसीपी, चार एसीपी यांच्या नेतृत्वात 800 पोलिसांचा ताफा राहणार तैनात

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998447
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group