भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये देविदास दुपारगडे (वय 40), नितीन वाघमारे (वय 35), आणि हनुमंत राठोड (वय 40) या तिघांचा समावेश आहे. तिघेही मुस्ती गावचे रहिवासी होते.
अपघातानंतर तिघांना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.