सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी मराठा आरक्षणासाठी लढत असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी प्रश्न उपस्थित केला आहे. एकेरी उल्लेख करून मनोज जरांगे हे स्वतःची प्रतिमा कमी करत आहेत. अशी टिप्पणी कदम यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचे जनक मनोज जारांगे यांनी महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करणं टाळावं,यातून मनोज जरांगे यांचीच प्रतिमा कमी होत आहे.
आपल्या पेक्षा वयाने मोठं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आदर करणे ही छत्रपती शिवरायांची संस्कृती आहे विचार आहे.
आपण मराठा आरक्षणाचे जनक आहात,आपला नेतृत्वाचा आम्हाला आभिमान आहे,परंतु आपण एकेरी उल्लेख करून आपली उंचावलेली प्रतिमा छोटी करत आहात, हीच विनंती. दरम्यान काय म्हणाले सुहास कदम पहा हा व्हिडिओ