कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर अनेक वर्षांपासून पदमगोंडा कुटुंबीय व बसवेश्वर सर्कलच्या वतीने दर रविवारी पूजन व स्वचछता ठेवण्याचे काम करत असताना,त्यांनी पुतळा परिसर सुशोभिकरणं बाबत आपली व्यथा माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यापुढे मांडली होती. जगदीश पाटील यांनी सोलापूर शहर स्मार्ट होत असताना,समस्त वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बसवेश्वर महाराजांचा पुतळा परिसर देखील स्मार्ट व्हावा या करिता सुरुवातीला नगरसेवक अमित पाटील यांच्या निधीतून पुतळा परिसर सुशोभिकरणं करण्याचे काम केलं व प्रशासकीय राजवट लागल्याने निधी अपूर्ण पडत असल्याने तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
पुतळा परिसर सुशोभिकरणं करणे करिता आपण निधी द्यावा याकरिता त्यांना विनंती केली व याबाबत मुंबईत देखील जगदीश पाटील,बसवेश्वर सर्कलचे गुरुराज पदमगोंडा,अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला,व विखे पाटील यांनी आयुक्त शीतल तेली उगले यांना, तात्काळ जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
विखे पाटील यांच्या आदेशानंतर महापालिकेकडून पुतळा परिसर सुशोभिकरणाचे नकाशा तयार करून,त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती व आता सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कार्यारंभ आदेश निघाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामात सुरुवात होणार आहे,यामुळे बसवभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.
जगदीश पाटील, गुरुराज पदमगोंडा, अक्षय अंजिखाने व सागर अतनुरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही पहिल्या भेटीत ज्यावेळी हा विषय सांगितलं त्याच वेळी त्यांनी सकारात्मकता दाखवत,आपण निश्चित राहा, मी स्वतः या कामाच्या उदघाटनाला येणार असून,याकरिता निधी कमी पडू देणार ही ग्वाही सोलापूर व मुंबईच्या भेटीत दिली होती व आमची ही मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचा भव्य दिव्य सत्कार आम्ही बसवेश्वर सर्कलच्या वतीने करणार आहोत.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभिकरणं कामाला अखेर,सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील मिळाला असून माजी नगरसेवक जगदीश पाटील व बसवेश्वर सर्कल संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.