खासदार प्रणिती शिंदे यांचे बाळीवेस मध्ये भव्य पोस्टर ; सुशील बंदपट्टे यांचे भाजपाला उत्तर
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. प्रणिती शिंदे या 75 हजाराच्या फरकाने विजयी झाल्या.
भाजपच्या राम सातपुते यांना शहर उत्तर मतदारसंघाने 35 हजाराचे मताधिक्य दिले. 2019 च्या तुलनेत हे मताधिक्य 50 टक्क्याने कमी झाले आहे. या भागातील वडार समाजाचे कार्यकर्ते सुशील बंदपट्टे यांनी या निवडणुकीत काँग्रेस साठी आपल्या समाजाला एकत्र करून पाठिंबा मिळवला होता.
![](http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/06/IMG_20240606_214230.jpg)
ही निवडणूक चुरशीची होऊन प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवला. बंदपट्टे यांनी या विजयाचा जोरदार जल्लोष केला. आपल्या नेत्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचे बाळी वेस भागात भले मोठे पोस्टर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून या पोस्टर द्वारे त्यांनी भाजपला एक प्रकारे उत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे.