लोकसभेच्या निकालानंतर रंग आमचाच उधळणार ; पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेसची कोरडी रंगपंचमी
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरा केली.
सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची वनवन होत असून शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे युवक काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिता शिंदे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 4 जून रोजी विजयी रंगपंचमी साजरा करू असा निर्धार युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगर यांनी केला.
प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,शरद गुमटे,सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे,महेंद्र शिंदे, विवेक इंगळे,आशुतोष वाले, सुरज शिंदे,मनोहर चकोलेकर,अमित लोंढे,सोमनाथ होनराव, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, चंद्रकांत नाईक उपस्थित होते.