कुंभारी येथील नुकसानग्रस्त पारधी समाजाला नुकसान भरपाई द्या ; राजश्री चव्हाण यांची मागणी
कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पारधी समाजच्या वस्तीवर कुंभारी येथील गावगुंडानी दहशत निर्माण करून जवळपास 200 ते 300 बेकायदेशीर जमाव जमवून अनेक पारधी समाजातील जवळपास 20 ते 30 घरांची तोडफोड केली तसेच मोटर सायकल, रिक्षा, फोर व्हीलर, किराणा दुकान यांचे नुकसान केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. व तसेच पारधी समाजातील आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर मधील टीव्ही, आरतीसाठी लावलेले साऊंड सिस्टिम, इलेक्ट्रिक लाईट, अनेक घरांचे खिडक्या, दरवाजे, घरातील टीव्ही, ससार उपयोगी वस्तू, उदरनिर्वाहाचे साधन असलेले चहाचे कॅन्टीन अशा अनेक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी पारधी समाजाचे संसार उघड्यावर पडले आहेत.
त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व शासन दरबारी नुकसान भरपाई द्यावी व पीडित आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन करावे. व तसेच कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे आदिवासी पारधी समाज कुंभारी येथील गाव गुंडामुळे भीतीच्या सावटाखाली वावरत आहे त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी ठोस आश्वासन दिले. कुंभारी येथील नुकसानग्रस्त आदिवासी पारधी समाजांना शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून देऊ तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पारधी वस्तीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्य राजश्री चव्हाण, भाजपा कोल्हापूर विभाग अ.जा.ज. सचिव नकुल चव्हाण, कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, फत्तेसिंग काळे, प्रल्हाद चव्हाण, विठ्ठल काळे आदी उपस्थित होते.