मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण लागू करा
कास्ट्राईब महासंघाने उपसले आंदोलनाचे हत्यार
सोलापूर. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्या अनुषंगाने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मनिष सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय समोरील पुनम गेट येथे खालील मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी करण्यात आले. माझी महापौर महेश कोठे यांनी आंदोलन स्थळी येऊन पाठिंबा जाहीर केला. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, लिपिक वर्गीय संघटना, जिल्हा परिषद युनियन, महसूल कर्मचारी संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
मागासवर्गीय पदोन्नती मधील आरक्षण तात्काळ लागू करावे, 2005 नंतरच्या कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, सरळ सेवा भरती मधील मागासवर्गीयांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा आणि राज्यातील कंत्राटी नोकर भरती धोरण रद्द करण्यात यावे, या व इतर मागण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वी करण्यात आले.
सदर मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंह यांना देण्यात आले.
यावेळी महासंघाचे महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर, उमाकांत राजगुरू, नरसिंग गायकवाड, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सलीम शेख, विजयकुमार इंजेवाड, सोलापूर विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष रवी शिंदे, विकास राठोड, हिप्परगे, शिरीष बंडखोर, जलसंपदा शाखेचे अध्यक्ष शरण अहिवळे, अजय कोनापूरे, शशिकांत माने, सचिन देसाई, सिद्धेश्वर नागणसूर सिद्धेश्वर नागणसूर, कोषागार शाखेचे अध्यक्ष कुलदीप सोनवणे, इम्तियाज शेख, विशाल गायकवाड श्रीमती छबू काळे, आरटीओ शाखेचे अध्यक्ष विकास रणदिवे, महेश इंगवले, मुजम्मिल शेख, श्रीमती पवार, श्रीमती खुडे, श्रीमती कांबळे, श्रीमती हिप्परगे, नगरपरिषद पंढरपूर शाखेचे अध्यक्ष अँड.किशोर खिलारे, आकाश बनसोडे किशोर दंदाडे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी महासंघाचे जिल्हा सचिव अरविंद जेटीथोर, कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, कोषाध्यक्ष विजयकुमार लोंढे, संघटक लक्ष्मण गायकवाड यांनी धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.