Saturday, April 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

इंद्रधनु सोसायटीत रंगला विनोदी आळशी डान्स ; गणेशोत्सव धुमधडाक्यात होतोय साजरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2025
in Ganeshotsav
0
इंद्रधनु सोसायटीत रंगला विनोदी आळशी डान्स ; गणेशोत्सव धुमधडाक्यात होतोय साजरा
0
SHARES
548
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंद्रधनु सोसायटीत रंगला विनोदी आळशी डान्स ; गणेशोत्सव धुमधडाक्यात होतोय साजरा

सालाबाद प्रमाणे यंदाही इंद्रधनु सोसायटीमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. इंद्रधनुतील रहिवाशांना रोज महाप्रसादाची सोय करण्यात येत आहे. संगीत खुर्ची ,हस्ताक्षर स्पर्धा, वृत्तपत्र अभिवाचन स्पर्धा, बॅडमिंटन, फॅशन शो तसेच रेकॉर्ड डान्स अशा स्वरूपाच्या स्पर्धा रोज उत्साहाने पार पडत आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250903-WA0064.mp4

यंदा स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपाची प्रश्नमंजुषा स्पर्धा  कुलकर्णी तत्कालीन कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सोलापूर यांच्या समन्वयाने इंद्रधनु मध्ये झोकात पार पडली त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विचारले जाणारे प्रश्न सुद्धा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आले व त्यांनीही व्यवस्थित उत्तरे देऊन इंद्रधनुवासियांची मने जिंकली. वृत्तपत्र अभिवाचन स्पर्धेत वृत्तपत्राची गोडी लहान मुलांच्या मनात निर्माण व्हावी व त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी डॉक्टर कामतकर यांनी अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

हस्ताक्षर स्पर्धेतील स्पर्धकांचे अक्षर हे वाखाणण्याजोगे होते व त्यात बक्षीस देताना परीक्षकांची तारांबळ उडाली म्हणजेच अलीकडची पिढी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धेत आपले नैपुण्य दाखवू शकते हे सिद्ध झाले. “नाच रे मोरा “या गाण्यावरील इंद्रधनुचे नृत्य व्हायरल झाले होते “याच नाच रे मोरा” चा भाग तीन साजरा झाला यात मराठी गाण्यांवर आळशी विनोदी नृत्य सादर करण्यात आली यात कुलकर्णी व त्यांच्या संघाने इंद्रधनु वासियांची मने जिंकली.

या नृत्यात प्रामुख्याने  कुलकर्णी,  पवार,  विक्रम बंडेवार,  कल्कोटे,  सुहास व जगदीश कुलकर्णी, श्रीधर व अश्विनी माने, पल्लवी बंडेवार, डॉक्टर प्रतिभा व डॉक्टर रमेश उकरंडे,  रमेश गुजर,  ढेरे यांचा सहभाग उल्लेखनीय होता व वयाची पन्नाशी पार केल्यानंतर सुद्धा नृत्याने सर्वांची मने जिंकता येतात याची प्रचिती या कार्यक्रमात आली. यातील सर्व स्पर्धक हे त्यांच्या क्षेत्रात तसेच उद्योगजगतात नाव कमावलेले आहेत.

“मराठी असे आमुची मायबोली” तत्त्वावर आधारित मराठी गाण्यांवर सादर केलेल्या नृत्याची छायाचित्रे व क्षणचित्रे आपणांसमोर आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही दाखवत आहोत.

गणेशोत्सवातील कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक इंद्रधनुने केलेले असून त्यात  अंकुश कुंभार यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. यानंतरही उर्वरित दिवसात कोणत्या स्पर्धा होतात व दरवर्षीप्रमाणे गाजणारा “गीत गुंजन”हा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा नक्कीच लक्षात ठेवण्याजोगा असेल अशी खात्री बाळगायला हरकत नसावी.

Tags: GaneshotsavIndradhanu
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

प्रकाश यलगुलवार यांनी आपल्या या संस्थेला दिले सुशीलकुमार शिंदे यांचे नाव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रकाश यलगुलवार यांनी आपल्या या संस्थेला दिले सुशीलकुमार शिंदे यांचे नाव

प्रकाश यलगुलवार यांनी आपल्या या संस्थेला दिले सुशीलकुमार शिंदे यांचे नाव

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1976569
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group