सोलापुरात ट्रॅफिक पोलिसांचा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’चा प्रकार ; नंबरप्लेट गोंधळ, ऑनलाईन दंड केला दीड हजार
सोलापूर : ट्रिपल शीट, राँग साईड गाडी चालवणे, फोन वर बोलणे, बिगर नंबर प्लेट गाडी चालवणे अशांवर सोलापूर वाहतूक पोलिसांनी थेट ऑनलाईन दंड करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बराच भार हलका होण्यास मदत झाली आहे.
एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र याच वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून चुका ही होत असल्याचे पाहायला मिळते. चोर सोडून संन्याशाला फाशी असा काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.
एका ऑनलाइन सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये एक युवक निळ्या रंगाच्या accsess या गाडीवर मोबाईलवर बोलत असल्याचे कॅमेऱ्याने टिपले आहे त्या गाडीचा क्रमांक MH 13 DN 8943 असा आहे, पण उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलुर येथील रहिवासी श्रीरंग मगर यांच्या हिरो होंडा या गाडीचा क्रमांक हा MH 13 DH 8943 वर पोलिसांनी दीड हजाराचा ऑनलाइन दंड टाकला आहे. त्या दंडाचे चलन पावती त्यांना टाकण्यात आली आहे.
दोन्ही गाडीचे नंबर समान आहे पण मध्ये N आणि H चा फरक आहे. असे असताना पोलिसांनी चुकीने दंड केल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.