राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस आयोजित रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धचे बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ताई प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये रामवाडी रायडर्स प्रथम क्रमांक, श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब द्वितीय क्रमांक व ओम दत्त मोरया तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डी संघास अनुक्रमे 51 हजार रुपये, 31 हजार रुपये, 11 हजार रुपये रोख पारितोषक व चषक देण्यात आले. या स्पर्धेचे उत्कृष्ट चढाई खेळाडू महेबूब विजापुरे,उत्कृष्ट पक्कड आदित्य नरळे, सामनावीर श्रीशिव जाधव यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संयोजक गणेश डोंगरे यांनी केले.
आमदार शिंदे खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हणाल्या, नेहमी काँग्रेस पक्ष खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतो. सोलापूरात खूप मोठ्या स्पर्धा रामवाडी भागात यशस्वीरित्या पार पाडल्या. संयोजक गणेश डोंगरे यांचे मनापासून आभार मानते त्यांनी ताई चषक स्पर्धा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडल्या. या स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करून सोलापूर वासियांना या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेता आला. खेळाडूंना भविष्यात भारतात चालणाऱ्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या संघात सहभागी होण्यासाठी सोलापूरच्या चांगल्या खेळाडूस मी नक्की मदत करेन.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव किसन मेकाले, मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, माजी नगरसेवक तोफिक हत्तुरे, उद्योजक राजेश डोंगरे, अंबादास करगुळे, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदनलाल गायकवाड, डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा गायकवाड, युवा नेते अनिल जाधव, एडवोकेट आझमुद्दीन शेख, कुतबुद्दीन शेख, चंद्रकांत रेवडकर, समीर हुंडेकरी, कॉन्टॅक्टर अजय राऊत, संघमालक सुरेश गायकवाड, सुदर्शन हसापुरे, दीपक जाधव, निखिल गायकवाड, नागनाथ जाधव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, शुभम माने, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलूर, सुभाष पाटोळे, रवींद्र गायकवाड, श्रीकांत जाधव, रमेश जाधव, अशोक गायकवाड, शंकर लोखंडे, यल्लाप्पा तुप्पदोळकर, रघुनाथ जाधव, कुमार गायकवाड, नागेश गायकवाड, शिवा गायकवाड, ज्योतीराम पाटील, आनंद दुधाळे, युवराज जाधव, दाऊद नदाफ, धीरज खंदारे, प्रतीक शिंगे, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, मनोहर चकोलेकर, विवेक इंगळे, मंगेश लामकाने आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती चंद्रकांत नाईक, शिवशरण नुला,गोपाल दोडमनी, योगेश माने,गणेश जाधव, राजू जाधव सर,ईलाई हलगूर,विनोद डोंगरे, सचिन गायकवाड,रेवण तोटदार,खंडू ढोकरे, बाबुलाल शेख,सागर भिसे,विकी आलाट,दयानंद जाधव,शैलेश जाधव,आकाश नाईक,रवी नाईक,अजय जाधव,दिनेश डोंगरे, विकी वाघमारे,आदींनी परिश्रम घेतले.