Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात एकवीस हजार शिवभक्तांसाठी झाली भोजनाची सोय ; रात्री बारा वाजेपर्यंत पंगती  ; बापूंच्या नियोजनावर कौतुकाचा वर्षाव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2024
in Social, solapur
0
सोलापुरात एकवीस हजार शिवभक्तांसाठी झाली भोजनाची सोय ; रात्री बारा वाजेपर्यंत पंगती  ; बापूंच्या नियोजनावर कौतुकाचा वर्षाव
0
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात एकवीस हजार शिवभक्तांसाठी झाली भोजनाची सोय ; रात्री बारा वाजेपर्यंत पंगती  ; बापूंच्या नियोजनावर कौतुकाचा वर्षाव

सोलापूर – ( प्रतिनिधी  ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्यावतीने सोमवारी राबविण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे २१ हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली . २१ हजाराहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळवेढा तालीमच्यावतीने मिष्ठांन्न जेवण देण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी यंदाच्या वर्षीसुद्धा शिवभक्तांना पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पार पडला.

थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि संकेत पिसे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत जेवणाच्या पंगती सुरू होत्या.

पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते  शिवपुजन करून तसेच शिवभक्तांना जेवण वाढून शिवभोजन  उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते. सोलापुरात शिवजयंतीच्या लक्षवेधी मिरवणुका निघतात. या मिरवणुका पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसेच ग्रामीण भागातील शिवभक्त सोलापुरात येतात. भर दुपारी शिवभक्त सोलापुरात येतात आणि रात्री उशिरा आपापल्या घरी जातात. मात्र घरी जाताना त्यांचे जेवणाचे आबाळ होतात. ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाचे संस्थापक अमोल शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या मिवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून सुरु केला .

सुरवातीस ५ हजार शिवभक्तांना आणि नंतर शिवजन्मोत्सव  निमित्त  शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी जेवण देण्यास सुरुवात केली  .  मागील वर्षी ११ हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यंदा २१ हजाराहून अधिक शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे .मिरवणुक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवसस्था मंगळवेढा तालीम संघाकडून करण्यात आली होती .

सोमवार १९ फेब्रुवारी  रोजी सायंकाळी ६  ते रात्री १२ वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ शिवभक्तांना टेबल खुर्चीवर शिवभोजन देऊन राबविण्यात आला.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, संकेत पिसे, भाजपचे उदयशंकर पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. दीपाली काळे, भगीरथ भालके, तुकाराम मस्के, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, राजेंद्र हजारे, ठाणे शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे, कपिल पिसे, दास शेळके, विकास गायकवाड, सायबण्णा तेगेळी, अनिकेत पिसे, सागर पिसे, विनायक महिंद्रकर, सुशील बंदपट्टे, जयश्री पवार, हरिभाऊ जाधव, शिवदास चटके, के. डी, कांबळे, प्रशांत बाबर, संतोष माळी, हरीभाऊ चौगुले, सचिन चव्हाण, अमोल कदम, समीर लोंढे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सोलापूर  शहरात निघणाऱ्या जल्लोषपूर्ण मिरवणूका पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना जेवन देताना ते अत्यंत सात्विक असावे या दृष्टीने मंडळाचे संस्थापक अमोल बापू शिंदे यांनी उत्तम नियोजन केले .जेवणाच्या ताटात पुरी ,दोन भाज्या, मसाला भात आणि गोड शिरा हा मेनू देऊन शिवभक्तांनी या शिवभोजनाचा लाभ घेतला. सुमारे २१ हजाराहून अधिक शिवभक्त या भोजनाचा लाभ घेणार असल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच आचारी मंडळींनी स्वयंपाक तयार करण्यासाठीची लगबग सुरू  होती.

Tags: Amol shindeथोरला मंगळवेढा तालीमसोलापूर शिवजयंती
SendShareTweetSend
Previous Post

अन् वंचित महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला ; शिवसेनेच्या सीमा पाटील यांचा आदर्शवत उपक्रम

Next Post

आता थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार ; दहावी- बारावी परीक्षेसाठी यंदा जिल्हा प्रशासन झाले अती स्ट्रिक्ट

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group