सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तुतारी वाजवली ; खरटमलांनी तुतारी फुंकली
सोलापूर : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना तुतारी हे चिन्ह मिळाले. शरद पवारांनी मोठ्या धुमधडाक्यात रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत तुतारी या चिन्हाचे जल्लोषात अनावरण केले.
त्यानंतर रविवारी सोलापुरात शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, कार्याध्यक्ष तौफिक शेख, महिला अध्यक्ष सुनीता रोटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जाऊन तुतारी वाजवून या चिन्हाचे स्वागत केले.
यावेळी स्वतः खरटमल यांनी तुतारी फुंकली.
दरम्यान खरटमल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हीच तुतारी आता लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना जागा दाखवेल, कुणी कितीही टीका करायची ते करू द्या तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही.