सोलापुरात पारंपरिक लोकनृत्य, वाद्यासह संत सेवालाल महाराज जयंतीची मिरवणुक




सोलापूर : श्री संत सेवालाल मध्यवर्ती मिरवणूक समितीच्या वतीने बंजारा समाजाचे दैवत
संत श्री सेवालाल महाराज जयंती निमित्त सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. बंजारा समाजाचे पारंपरिक लोकनृत्य आणि वाद्यासह निघालेल्या मिरवणुकीने लक्ष वेधले. या मिरवणुकीत पोलिसांनी घालून दिलेले आवाज मर्यादेचे सर्व नियम पाळण्यात आले होते. बंजारा समाजाने मध्यवर्तीची एकच मिरवणूक काढून आदर्श घालून दिला.
प्रारंभी मध्यवर्तीच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार, माजी आमदार दिलीप माने, बंजारा समाजाचे माजी आमदार देवानंद चव्हाण, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगणुरे, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बंजारा समाजाच्या प्रथेनुसार भोग घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
बंजारा समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. युवक युवती यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद लुटला. संत सेवालाल महाराजांचा एकच जयघोष करण्यात आला.
ही मिरवणूक सात रस्ता येथून निघून शासकीय विश्रामगृह, पत्रकार भवन, संभाजी तलाव, विजापूर नाका मार्गे नेहरूनगर या ठिकाणी विसर्जित झाली.
या मिरवणुकीत मध्यवर्तीचे प्रवर्तक युवराज राठोड, उत्सवा अध्यक्ष युवराज चव्हाण, डीएम ग्रुपचे युवराज चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, कविता चव्हाण, सचिन चव्हाण, विजय राठोड, नाम पवार, श्रीमंत पवार, सरपंच प्रेम राठोड, प्रेमचंद राठोड, नवनाथ जाधव, अजय चव्हाण, अविनाश पवार, विकास चव्हाण, सतीश राठोड, शिवाजी राठोड यांच्यासह बंजारा समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.