प्रमोद गायकवाड यांच्यासह चौघांना अटक ; दोन दिवसांची पोलीस कोठडी ; काय आहे गंभीर प्रकरण
सोलापूर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह त्यांचे मुलं व पुतण्या असे एकूण सहा जणांवर सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला असून या प्रकरणात प्रमोद गायकवाड यांच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयात हजर केले असता त्या चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीमा विलास गायकवाड, वय ३५ वर्षे, राहणार सिध्दार्थ हौसिग सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसेनजित उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत ऊर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोन्या ऊर्फ संजय देवेद्र गायकवाड, मनोज राजु अंकुश, सनी निकंबे सर्व रा- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर यांच्याविरुद्ध सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल फिर्याद नुसार यातील फिर्यादीचे शेजारी राहणारे शिरसे व शिवशरण यांचेशी जुने भांडण झाल्याचा राग मनात धरून आरोपी सनी निकंबे, आरोपी प्रमोद गायकवाड सोबत दारू पिवून अंगावर येवून आदित्य दावणे यास प्रमोद गायकवाड यांनी पट्टयाने मारून भांडणे सुरू करून फिर्यादी व फिर्यादीचे मुले सुमित व रितेश गायकवाड यांना तसेच भांडणे सोडवायला आलेले निलेश शिरसे, सागर शिरसे, वैभव वाघे यांस लोखंडी रॉड, लाकडी दंडुक्यांने जीवे मारण्याचे उद्देशाने मारहाण करून आम्हास तसेच वैभव वाघे यास गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील हे करत आहेत.