सोलापुरात आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक ; या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आरोप
सोलापूर – बापूजी नगर येथे सोमवार रात्री आठ च्या सुमारास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कुरमेश बुगले, विशाल बुगले, गणेश म्हेत्रे व अन्य कार्यकर्त्याकडून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर हे घरात नसताना त्यांच्या घरावर दगडफेक केली.
त्यामुळे सभोवतालचे परिसर वातावरण खूप तंग झाले. ही बातमी माकपचे कार्यकर्ते ॲड. अनिल वासम यांना या भागातील नगरसेविका कामिनी आडम यांनी फोनवर कळविले असता अनिल वासम हे तात्काळ आडम मास्तर यांच्या घराजवळ तात्काळ पोहोचले त्यावेळी येथे प्रचंड गोंधळ व बाचाबाची चालली होती. त्यावेळी यल्लप्पा भंडारी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केले मात्र ते आक्रमकपणे ठिकाणी गोंधळ करत होते. अनिल वासम हे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला.
112 वर पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांचा ताफा तिथे आला. दरम्यान आमचे नेते आडम मास्तर यांच्या घरावर का ?दगडफेक केली अशी विचारणा केली असता धक्काबुक्की झाली. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात तणाव वाढला.
सदरची हकीकत सदर बाजार पोलीस ठाणे या ठिकाणी भ्रमणध्वनी द्वारा कळविण्यात आले त्यानंतर सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाठवून वातावरण काबूत आणले.
त्यानंतर संबंधितावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू केले त्यावर जेष्ठ नेते मास्तर यांना ही बाब समजताच प्रचंड संतापले माझ्या जीवाला धोका असून समाजामध्ये असे उपद्रव करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.