सोलापुरात काँग्रेस कडून शहर मध्य साठी चेतन नरोटे यांना उमेदवारी
खासदार प्रणिती शिंदे यांच्या हक्काच्या शहर मध्य या मतदारसंघांमध्ये शेवटी काँग्रेसने बाजी मारली असून या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नरोटे हे मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली.
या मतदारसंघात काँग्रेसची वोट बँक असलेले मोची समाज आणि मुस्लिम समाज आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.