एकनाथ शिंदेंवरील निष्ठा गेली कुठे? सोलापूरचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा स्वराज्य पक्षात प्रवेश ; आता यांचे कसे जमू लागले
भाजपच्या राजकारणाला कंटाळून आणि शिवसेनेच्या नरमाईच्या भूमिकेमुळे अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, युवासेना प्रमुख उमेश गायकवाड यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असून ते उद्या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वच पदाधिकाऱ्यांना सांभाळून घेताना ताकद दिली. मुख्यमंत्र्यांमुळे हे सेफ राहिले, प्रचंड मोठा निधी सोलापूरच्या विकासासाठी दिला परंतु ऐनवेळी याच नेत्यांनी आपले नेते एकनाथ भाई यांना ठेंगा दाखवला आहे.
आताही नेतेमंडळी सोलापूर शहरातील विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते पण ते कितपत या मतदारसंघात टिकणार हा येणारा काळच ठरवणार आहे मनीष काळजे आणि अमोल शिंदे यांच्यात जमत नव्हते आता हे मिळून स्वराज्य पक्षात कसे काय गेले? हा सुद्धा सोलापूरकरांना पडलेला मोठा प्रश्न आहे.