सोलापुरात ट्रक खाली येऊन महिला जागीच ठार ; बोरामणी नाका येथील घटना
सोलापूर शहरात जड वाहतुकी चा प्रश्न अजूनही गंभीर आहे याजवळ वाहतुकीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान बुधवारी बोरामणी नाका येथे एका ट्रकच्या खाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली.
या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकच्या खाली आल्याने सदर महिला ही चेंदामेंदा झाली होती.
अंबुबाई शंकर बिचल वय 53 वर्ष राहणार घोंगडे वस्ती, भवानी पेठ सोलापूर असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला ही आपल्या सासऱ्यासोबत दुचाकी टीव्हीएस MH 13 DD 6528 गाडीवरून राहते घर घोंगडी वस्ती येथून नवीन घरकुल येथे जात होती. बोरामणी नाका पेट्रोल पंपा समोर येताच ट्रक क्रमांक MH 13AX 3568 या गाडीने धडक दिल्याने गाडीवरील महिला ही ट्रकच्या खाली आली आणि तिचा जागीच मृत्यू गेला.