भाजपच्या नव्या अध्यक्षांची दमदार एन्ट्री ; रोहिणी ताईंनी पदभार घेतला
भारतीय जनता पार्टीचे नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी आज अध्यक्ष पदाचा पदभार निवडणूक अधिकारी निता केळकर यांच्या हस्ते स्वीकारला.
प्रथमच भाजप शहराध्यक्ष पदी महिला विराजमान झाले, रोहिणी तडवळकर या भाजपच्या जुन्या अनुभवी नेत्या,अभाविप पासून झालेली सुरुवात ते आज भाजपा शहराध्यक्ष होत असताना मोठा संघर्ष यांनी राजकीय जीवनात केला,सोलापूर महापालिकेच्या विरोधी पक्षनेता असताना जनतेच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून देखील यांचे कार्य सर्वांना ज्ञात असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या यांच्या कौशल्याने नक्कीच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीला बळ भेटणार यात तिळमात्र शंका नाही अशी चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाली.
आज झालेल्या पदग्रहण सोहळ्यात भाजपच्या शहरातील सर्व जुने कार्यकर्ते एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले,ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीत आपले मोलाचे योगदान दिले असे किशोर देशपांडे साहेब,मोहिनी पत्की, नरसिंग मेंगजी यांच्यासह अनेक जुने कार्यकर्ते आज कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित होते.