Monday, March 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 January 2026
in political
0
सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार
0
SHARES
343
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार

सोलापूर महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहे. या निवडणुकीत सोलापुरातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपने पक्षात घेतले पण तिकीट वाटप करताना 75 टक्के मूळ भाजप कार्यकर्त्यांना तिकिटे दिली आणि 25% भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर पक्षातील नेत्यांना तिकिटे दिली.

विशेष बाब म्हणजे या २५ टक्क्यांमधील बहुतांश तिकिटे ज्या ठिकाणी भाजप कधीच विजयी झाला नाही अशांवर लक्ष केंद्रित करत पालकमंत्री गोरे यांनी बाहेरच्या पक्षातून आलेल्या माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, गणेश वानकर, किसन जाधव, नागेश गायकवाड, पद्माकर काळे, बिज्जू प्रधाने, विनोद भोसले, अंबादास करगुळे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांमध्ये देण्यात आली आहेत.

माझा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण महापालिकेच्या दरम्यान निर्माण केले होते. याला छेद देत भाजपाने सोलापूर शहराचे राजकारण व्यक्तिकेंद्रित न करता पक्षकेंद्रित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

गटातटाच्या राजकारणाकडे लक्ष न देता वरिष्ठांच्या भूमिकेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि माजी नगरसेवक नरेंद्र काळे यांचा राजकीय बळी जाऊ न देता त्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे दिसते. नरेंद्र काळे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने अनेकांना आनंद झाला आहे.

यंदा भाजपाची वाटचाल महापालिका निवडणुकीत मागील वेळेपेक्षा अधिक जास्त जागा मिळवण्याकडे सुरू झाली आहे, निवडणूक लागण्याच्या दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदा भाजप सोलापुरात सिक्सटी प्लस होईल अशी घोषणा केली होती त्याला अनुसरूनच विरोधकांना चेकमेट देत त्यांनी ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे दिसून येते.

२०१७ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षातून आलेल्या तब्बल ४८ जणांना भाजपाकडून तिकिटांचे वाटप करण्यात आले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र भाजपाने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांनाच अधिक संधी देण्याची ठाम भूमिका घेत केवळ २५ टक्केच तिकिटे बाहेरून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना दिली आहेत.

विरोधी पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या नेत्यांना भाजपाने वेळीच सामावून घेतले नसते तर जनमानसात मोठा प्रभाव असलेले हे नेते भाजप विरोधी पक्षात जाऊ शकतात याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरी नेत्यांची नाराजी पत्करून शहरातील विविध पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपा प्रवेश दिला. ही बाब आता मात्र भाजपच्या पथ्यावर पडणारी दिसून येत आहे.

सोलापूरच्या या राजकीय हालचालींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले बारीक लक्ष हे सोलापुरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पक्षातीलच काही नेते मंडळींनी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी संभ्रम निर्माण केल्याचा प्रयत्न दिसून येत आहे. या सर्व गोंधळानंतरही सगळ्या १०२ जागा लढवणारा पक्ष केवळ भारतीय जनता पार्टी ठरला आहे.

Tags: @MNC electionJaykumar goreभाजप
SendShareTweetSend
Previous Post

एमआयएमच्या ‘पठाण’ यांनी केली ‘गाझी’ अडून ‘कम्मो’ची गेम

Next Post

काँग्रेसच्या दोन्ही हातात शरद पवारांची तुतारी ; बाबा दादांचा सपोर्ट, प्रभाग वीसचे गणित असे जुळले!

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970919
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group