
सोलापुरात पी बी ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; चंदनशिवे यांचे सिद्धेश्वर भक्तांनी केले कौतुक
सोलापूर – ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेले 68 लिंग व शहरातील अष्टविनायक हे सोलापूर शहरातील प्रमुख श्रद्धास्थान असून सालाबादप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रा भरत असते या यात्रा सोहळामध्ये 68 लिंग तैला अभिषेक नंदिध्वज प्रदक्षिणा पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम या सह साजरी होत असते.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंग पैकी बुधवार पेठ परिसरातील श्री अनंत रामेश्वर लिंग; श्री पाशुपतीय लिंग; श्री जगेश्वर लिंग; श्री शतकेश्वर लिंग; श्री यल्लेश्वर लिंग यांचा समावेश असून यातील श्री सिद्धरामेश्वर स्थापित 5 वा विरकर गणपती मंदिर व 31 लिंग श्री पशुपतीय लिंग या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज भक्तगण यांच्या सेवेसाठी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून दूध वाटप कार्यक्रम होत असतो सालाबादप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रा निमित्त भक्तगणाच्या सेवेसाठी ‘प्रबुद्ध भारत तरूण मंडळ’ (पी.बी. ग्रुप) च्या वतीने 12/01/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ‘दुध वाटप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वीरकर गणपती श्री चे आरती करून या कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली.
यानंतर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त नंदीध्वजा सोबत 68 लिंग पायी चालत जाणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर भक्तांच्या सेवेसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दूध वाटप सुरुवात करण्यात आली.
वीरकर गणपतीचे पुजारी हक्के, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेवक अमर पुदाले, उद्योजक इंद्रमल जैन, उद्योजक तुकाराम गायकवाड, पुरुषोत्तम धूत, जयचंद वेद, गौतम वेद, राजगोपाल धूत, एस के ग्रुप चे संस्थापक रविकांत कोळेकर, राजाभाऊ काकडे, आनंद मुस्तारे, आरोग्य निरीक्षक बसवेश्वर जमादार, आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सचिव चंद्रकांत सोनवणे, गौतम नागटिळक, अविनाश भडकुंबे, सिद्धांत सुर्वे, कोळी समाज जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, गोपीनाथ जाधव, पी.बी. ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, हृदयनाथ मोकाशी, देविदास चेळेकर, शिवकुमार हिरेमठ, राजा कुलकर्णी, रोहन लोंढे, उमेश डोईजोडे, संजय सिंदगी, राजू चोळे, विश्वजीत तपसारे, सचिन कुलकर्णी, चंद्रकांत जमगंडी, सचिन कुलकर्णी, राजू चवळे, इत्यादीं मान्यवर या दूध वाटप कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदवला.
यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनद चंदनशिवे यांनी श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा निमित्त नंदीध्वज सोबत 68 लिंग प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तगणांच्या सेवेसाठी वीरकर गणपती येथे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे माझे भाग्य असल्याचे सांगितले.
यावेळी पंकज बनसोडे, नंदू जाधव, खंडू बनसोडे, दत्ता जाधव, आप्पा बनसोडे, अनिल बनसोडे, शीतल मस्के, संकेत शिंदे, सौरभ लोंढे, संतोष रणदिवे, संकल्प लोंढे, रितेश वाघमारे इत्यादी बाराबंदी वेशभूषा परिधान करून वीरकर गणपती येथे सहभाग नोंदवला.
यावेळी सचिन तीर्थकर कमलेश पुजारी मुकेश पुजारी , गौतम शिंदे ,सुरज पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पुजारी, सुमित चंदनशिवे ,अखिल भारतीय वारकरी सांप्रदाय मंडळाचे ओंकार हुमनाबादकर ,अनिल धावणे ,रोहित हुमनाबादकर, संजय डोके ,दीपक देशमाने, सिद्धांत तळभंडारे, नितीन गादेकर, भीमराज मस्के, प्रथमेश सुरवसे ,आदित्य साबळे, रोहन तळभंडारे, नागेश कुंभार, शिवराम कांबळे, सुभाष थोरात, सतीश अडाकुल ,जयराज सांगे ,सिकंदर शेख ,सुरज गायकवाड, डबल वाघमारे, बसू आळगे, सुरज जगताप ,सुरज पाटील, किरण चंदनशिवे, सिद्धांत तळभंडारे, आप्पा चंदनशिवे इत्यादी पी बी ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.