सोलापुरात एमआयएमला धक्का ; दक्षिण तालुका अध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर : एकीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एमआयएम हा पक्ष उमेदवार देण्याच्या भूमिकेत असताना दुसरीकडे मात्र पक्षाला धक्का बसला आहे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
एम आय एम चे दक्षिण तालुका अध्यक्ष अमीन नदाफ यांनी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हा प्रवेश दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातून झाला आहे. यावेळी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, शिव कल्याणी, जितु गावढे, आकाश पुजारी, महिबुब पठाण, बुडन मोमीन, चांद लिगेवान, राजरत्न गावढे, तोफीफ शेख, हुषेन लिगेवान, राम बिले, आनंद गावढे आदी उपस्थित होते.
यावेळी अमिन नदाफ म्हणाले, मी गेल्या दहा वर्षांपासून एम आय एम पक्षाचे काम पाहतो परंतु, निवडणूक पुरता आमचा वापर करुन घेतात परत पक्षाचे नेते भेटत पण नाहीत आणि आमच्या पक्षाकडून उलट भाजपाच्या उमेदवाराला मदत होत असते. त्यामुळेच प्रणिती शिंदे यांचे काम फार चांगले आहे त्याना निवडून आणण्यासाठी मी प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सांगितले.