Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण ; विजय मालकांनी करून दाखविले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 August 2025
in political
0
सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण ; विजय मालकांनी करून दाखविले
0
SHARES
566
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण ; विजय मालकांनी करून दाखविले

मुंबई, १५ ऑगस्ट २०२५ : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील एकूण १३४८ लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, १७ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प, गट क्र ९२/२, दहिटणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतील सार्वजनिक–खाजगी भागीदारी मध्ये परवडणार्या दरातील गृह बांधणी या घटकांतर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ५० इमारतींतून ३२७ चौ फुटांच्या १२०० स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून या गृहप्रकल्पांतर्गत आतापर्यंत ११२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहप्रकल्पांतर्गत ८ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण २५२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २२० सदनिकांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यामध्ये गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे. यामुळे लाभार्थी सदनिका धारकास रु. १ लाख प्रती सदनिकेच्या किंमतीमध्ये बचत झाली आहे. असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत रु. २ लाखांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा कामांसाठी म्हाडाकडे जबाबदारी सोपविली यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा या दोन्ही बाबी म्हाडामार्फतच राबविण्यात आल्या. सदर प्रकल्प राबविण्यात येत असतांना आलेल्या अडचणींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे नियोजन सुकर केले आहे. नागरिकांचे जीवनमान सुखकर होण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांतर्गत सामुदायिक सभागृह, अंगणवाडी, सौरउर्जेवर चालणारे दिवे, मुलांसाठी खेळण्याचे मैदान, बाग व त्यामध्ये व्यायामाकरिता आवश्यक उपकरणे, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क खर्च केवळ रु. १००० आकारण्यात येणार आहे. तसेच गृहकर्जाचा मासिक हप्ता हा सध्या राहत असलेल्या घर भाडे एवढाच असणार आहे. सदर प्रकल्पास नगरोत्थान महाभियानंतर्गत राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या रु ३३.०८ कोटींच्या निधीतून रस्ते, विकास, ड्रेनेज व पाणी पुरवठा पाइपलाइन सारख्या सुविधांचे नियोजन केले आहे. तसेच म्हाडातर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत दहिटणे व शेळगी या दोन्ही गृहप्रकल्पांच्या आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ३ ते ४ वर्षांची पर्यावरण पूरक वृक्ष लावण्यात आली आहेत.

Tags: #CM maharashtra#Devendra fadanvisMLA vijaykumar deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

रेड आर्मी जिल्हाधिकारी कार्यालयात ; फोटो काढण्याचा पालकमंत्र्यांना ही आवरला नाही मोह

Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाटील महामंडळाच्या चार लाभार्थ्यांना मिळणार धनादेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाटील महामंडळाच्या चार लाभार्थ्यांना मिळणार धनादेश

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाटील महामंडळाच्या चार लाभार्थ्यांना मिळणार धनादेश

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998474
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group