सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक ; आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार ; या शहराची विमानसेवा होणार सुरू
नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आज महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळ संदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
केंद्र सरकारने उडान-आरसीएसच्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर ५० कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे केली आहेत.विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच हे दल सेवेत दाखल होणार आहे.
डीजीसीए लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्रीमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सोलापूर-मुंबई, सोलापूर-तिरुपती, सोलापूर-दिल्ली, सोलापूर-हैदराबाद आदी विमानसेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली. येत्या ऑक्टोंबर मध्ये विमान सेवा करण्याचा प्रयत्न असल्याचे कल्याणशेट्टी म्हणाले.
या बैठकीत विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम सुरेश, नियोजन आणि संचालन मंडळाचे सदस्य डॉ. शरद कुमार तथा आकासा, इंडिगो आदी विमान कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.