पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
नाट्य संमेलनाच्या रंगमंचाचे उद्घाटन ; दादांची दहा कोटींची घोषणा
सोलापूर दि. 26 (जिमाका) :- सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे. कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जुळे सोलापूर येथे नाट्यगृह उभारणार असून त्यासाठी 10 कोटी निधीची तरतूद केली असल्याची घोषणा पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रंगमंचाचे उद्घाटन पालकंमत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संमेलन कार्यवाह विजय साळुंके, प्राचार्य शिवाजी सावंत, संमेलन कार्याध्यक्ष प्रकाश युलगुलवार, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रणजित गायकवाड, पी. पी. रोंगे, सहकार्यवाह विश्वनाथ आवड, तेजस्विनी कदम, नरेंद्र काटीकर, दत्ता सुरवसे, मोहन डांगरे, भारत जाधव, नाट्यरसिक, कलांवत आदि उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, नाट्यगृह उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर येथे होत असल्याबद्दल आनंद आहे. संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नाट्यसंमेलन यशस्वी होऊन सर्वांच्या आठवणीमध्ये राहील यासाठी श्री सिद्धेश्वर व पांडुरंग चरणी प्रार्थना असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
नाट्य संमेलनाचे प्रास्ताविक विजय साळुंके यांनी केले. तसेच मनोगत प्रकाश युलगुलवार व प्राचार्य शिवाजी सांवंत यांनी व्यक्त केले.