सीईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी झेडपी मध्ये शासकीय ध्वजारोहण
सोलापूर : 1 मे महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी तिरंग्यात मानवंदना दिली. यानंतर महाराष्ट्र गीत झाले.
सीईओ मनिषा आव्हाळे यांनी सोलापूरकरांना महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना महाराष्ट्र राज्य देशात विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.
त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी उपस्थितांना स्वच्छ वसुंधरेची शपथ दिली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे, सुनील कटकधोंड, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह
जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.