Sunday, October 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यावर’ राहीली विशेष नजर ; ‘मायक्रो प्लॅनिंग’ने शहर मध्यला पाडले खिंडार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 May 2024
in political
0
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यावर’ राहीली विशेष नजर ; ‘मायक्रो प्लॅनिंग’ने शहर मध्यला पाडले खिंडार?
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची काँग्रेसच्या ‘बालेकिल्ल्यावर’ राहीली विशेष नजर ; ‘मायक्रो प्लॅनिंग’ने शहर मध्यला पाडले खिंडार?

सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजपा आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाच असा चंग बांधलेल्या भारतीय जनता पार्टीने ‘मायक्रो प्लॅनिंग’ करून शहर मध्य मतदार संघातील मते खेचून आणण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते मोहन डांगरे यांनी शहर मध्य मतदारसंघात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांपर्यंत संपर्क केला. आणि निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मतांची बेरीज करत शहर मध्य मतदारसंघात अनेक ठिकाणी एकगठ्ठा असलेली मते भाजपाकडे वळविण्यात यश मिळवल्याचे दिसून आले.

मोहन डांगरे यांनी जानेवारी महिन्यात भटक्या विमुक्त समाजातील १५० जणांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत लावून शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या विमुक्त जातीजमातीतील नागरिकांशी संपर्क सुरू केला होता. या भटक्या विमुक्त जाती जमातींचे नेतृत्व करणाऱ्या भारत जाधव यांना हेरून त्यांना भाजपच्या संपर्कात आणले. स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीपासून दूर राहिलेला हा समाज भाजपाशी जोडण्यात मोहन डांगरे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून यश मिळवले.

कैकाडी समाजाचे नेते असलेल्या वसंत जाधव यांच्या साथीने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी आपलेसे केले. निवडणुक रंगात असतानाच भटक्या विमुक्त जातीजमातीच्या संस्थेचा सुमारे २० हजार जणांचा मेळावा या निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदार संघात टर्निंग पॉईंट ठरला. या मेळाव्यात नागरिकांनी दिलेल्या ‘मोदी मोदी’ च्या घोषणा भाजपासाठी फलदायी ठरणार हे तेंव्हाच निश्चित झाले.

गेल्या तीन वर्षांपासून आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या मोहन डांगरे यांनी विडी घरकुल परिसरात लोकसभा निवडणुकीत तेथील नागरिकांशी संपर्क साधत स्थानिकांना होणारा प्रचंड विरोध झुगारून त्यांना भाजपाच्या संपर्कात आणण्यात मोठी भूमिका बजावली. याशिवाय शहरातील वडार, लोधी, कोळी, हटगार विणकर अशा अनेक समाजांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः भेटी देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचविले.

यंत्रमाग कामगार, कारखान्याचे मालक, विविध जाती समूहातील प्रभावशाली व्यक्ती, पेन्शनर्स नागरिक अशा समाजातील सर्व स्तरातील घटकांना सोबत घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मोहन डांगरे यांच्या टीमने शहर मध्ये प्रचाराचा धुराळा उडून दिला होता. सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसची ताकद खिळखिळी करण्यासाठी याचा मोठा उपयोग झाल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मोहन डांगरे आणि त्यांच्या टीमसह भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे परिणाम मतपेटीत बंद झाले आहेत. ४ जून रोजी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विजयाची खात्री भाजपाकडून व्यक्त होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठा विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने या निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय मिळवला तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मोहन डांगरे आणि त्यांच्या टीमने केलेल्या ‘मायक्रो प्लॅनिंग’ चा वाटा मोठा राहणार हे निश्चित ! अशी भावना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

Tags: #chandrakant patilBJPLoksabha election 2024Mohan DangareSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात बाल श्रामनेर शिबिर उत्साहात ; 32 मुलांचा सहभाग

Next Post

राम सातपुते की प्रणिती शिंदे ; सोलापूरच्या दोन राजकीय ‘प्रशांत’मध्ये लागली 1 लाख रुपयाची पैज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात लीड कुणाला? प्रणितीताई की रामभाऊ ; M फॅक्टर ठरणार निर्णायक

राम सातपुते की प्रणिती शिंदे ; सोलापूरच्या दोन राजकीय 'प्रशांत'मध्ये लागली 1 लाख रुपयाची पैज

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002605
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group