फारुख शाब्दी जिंकले, बाकी सर्वच हरले ..! सोलापूर शहर मध्य मतदारसंघात हे काय घडले
सोलापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षात राहणारी ठरली आहे. एका मुस्लिम समाजावर आमदार होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असले तरी या निवडणुकीत एम आय एम चे उमेदवार फारूक शाब्दि यांनी मात्र सर्वांचे मन जिंकली आहेत. या निवडणुकीचा निकाल आणि मिळालेले मते पाहता फारूक शाब्दि जिंकले आणि इतर सर्वच हरले असेच म्हणावे लागेल.
काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने त्यांच्या मतदारसंघात आमदार होण्यासाठी अनेक इच्छुकांना संधी निर्माण झाली. काँग्रेस पक्षाकडून मोची समाज आणि मुस्लिम समाज उमेदवारीसाठी आक्रमक पाहायला मिळाला. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी ही इच्छा व्यक्त केली होती.
काँग्रेस पक्षाने सुरुवातीला बाबा मिस्त्री यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला परंतु मिस्त्री यांनी नकार दिला त्यामुळे मुस्लिम आणि मोची समाजाला उमेदवारी न देता चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली.
दुसरीकडे फारूक शाब्दि हे तर एम आय एम कडून फिक्स होते. हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा असल्याने शिवसेनेने सुद्धा या मतदारसंघातून मागणी केली होती. त्यासाठी मनीष काळजे आणि शिवाजी सावंत हे इच्छुक होते. जागा वाटपाच्या ॲडजस्टमेंट मध्ये ची जागा भाजपने घेतली. देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली.
एकूणच या मतदारसंघाचा विचार केला तर 2009, 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत प्रत्येक वेळी चौरंगी, पंचरंगी लढती या ठिकाणी होतात. यामध्ये 2014 मध्ये प्रणिती शिंदे या 47 हजारावर गेल्या होत्या त्यानंतर त्या 52 हजारावर गेल्या.
एकूणच हे मतदान पाहता या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने किमान 70 हजार मतांची अपेक्षा ठेवली होती. तर एम आय एम पक्षाने 2019 वेळी मिळालेले 38 हजार 900 मध्ये त्यावर 60 ते 65 हजार मते घेण्याचा निश्चय केला होता.
या विधानसभा मतदारसंघात सर्व समाजाची मते जो उमेदवार घेतो तो विजय होतो असा इतिहास आहे. त्यामुळे फारूक शाब्दि यांना जरी मुस्लिम समाजाची 50 हजार मते या निवडणुकीत मिळतील आणि त्यावर आणखी दहा ते पंधरा हजार इतर समाजाची मते घेऊन विजयी होण्याचा संकल्प केला होता.
मतदान उत्साहात झाले काँग्रेसने ही ताकद लावली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही शेवटची निवडणूक समजून कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले.
या निवडणुकीत काँग्रेसला जरी विजय मिळणार नसला तरी ते किमान 30-35 हजारापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर आडम मास्तर पंधरा ते वीस हजार पर्यंत जातील असे अनेकांना अपेक्षा होती. भाजप आणि एमआयएम मध्ये अटीतटीची लढत होऊन दोघांपैकी एक जण विजयी होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु झाले उलटेच भारतीय जनता पार्टीने एक लाख पेक्षा अधिक मते घेतली.
भाजपचे देवेंद्र कोठे 48 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले पण शाब्दी यांनी 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत दोन 23 हजार मते अधिक घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांना 61400 मते मिळाली. सोलापुरात एका मुस्लिम कार्यकर्त्याला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. भाजप सोबत शिवसेना होती, राष्ट्रवादी होती त्यांचे अनेक कार्यकर्ते होते. यंत्रणा होती परंतु फारुक शाब्दी यांच्याकडे केवळ अससूद्दीन ओवेसी यांची सभा वगळता त्यांनी स्वतःचीच यंत्रणा लावली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मतदारांनी थेट नाकारले आणि ती मते भाजपला मिळाली त्यामुळे एमआयएमचा पराभव झाला.
एकूणच ही निवडणूक पाहता फारूक शाब्दि यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे पाहायला मिळाले. त्यांची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा तसेच या निवडणुकीत हिंदू मुस्लिम चा कोणताही वाद चव्हाट्यावर येऊ नये याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली होती. आपल्या प्रचारात त्यांनी भगवे, निळे, हिरवे, पांढरे हे सर्व झेंडे वापरले. त्यामुळे संवेदनशील अशा या मतदारसंघात पोलिसांना ही कोणती अडचण झाली नाही.