भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा 13 जानेवारी रोजी वाढदिवस संपन्न झाला वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यात अनेक सामाजिक उपक्रम पार पडले, सोलापूरात मात्र प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना व बावनकुळे यांचा वाढदिवस या दोन्हीचे निमित्त साधून शहरातील प्रदेश पदाधिकारी यांनी एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राण प्रतिष्ठापना निमित्त मंदिरातील परिसर स्वचछता अभियान व 22 जानेवारी रोजी घरासमोर दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते या आवाहनास प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, SC मोर्चा प्रदेश सचिव राजा माने, प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, संजय साळुंखे, OBC मोर्चाचे यतीराज होनमाने व प्रदेश पदाधिकारी यांनी शहरातील विविध भागात मंदिर स्वचछता अभियान व एक दिवा प्रभू श्रीरामासाठी अभियानाचे आयोजन केले असून या अभियानाचा शुभारंभ 17 जानेवारी रोजी होणार आहे.