सोलापूर जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी दिलीप स्वामी हे आयएएस अधिकाऱ्यांच्या सिलेक्शन ग्रेडमध्ये गेले आहेत.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतेच एक नोटिफिकेशन काढले असून त्यामध्ये राज्यातील 2011 च्या बॅचचे 24 आयएएस अधिकाऱ्यांना सिलेक्शन ग्रेड मध्ये घेण्यात आले आहे. त्यांना 13 व्या पे स्तरावर एक जानेवारी 2024 पासून निवड श्रेणीच्या पदोन्नतीमध्ये घेण्यात आले आहे.
त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा समावेश आहे. दिलीप स्वामी यांच्यासह राहुल अशोक रेखावार, पी. शिवशंकर, एम. देवेंद्र सिंग, संजय मीना, कान्हूराज एच. बगाटे, भाऊसाहेब दांगडे, किशन नारायणराव जावळे, संजय रामराव चव्हाण, सिद्धराम सलीमठ, रघुनाथ खंडू गावडे, किशोर सदाशिव तावडे, कविता विश्वनाथ द्विवेदी, सुधाकर बापूराव तेलंग, एम.व्ही. मोहिते, राजेंद्र शंकर क्षीरसागर, प्रवीण पुरी, वर्षा तहकूर-घुगे.