पंढरपूर : सध्या सोशल मीडिया द्वारे नवनवीन बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत. सोशल मीडियावर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना शासन दरबारी योग्य न्याय मिळावा, त्यांच्या अडीअडचणी,समस्या यांची सोडवणूक व्हावी याकरिता ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली असून या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी व्हिजन वार्ता चे संपादक प्रवीण नागणे यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच संघटनेची बैठक पार पडली .या प्रसंगी संपादक सतीश सावंत,ज्येष्ठ पत्रकार सुनील उंबरे,सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कटारे,कार्याध्यक्ष परशुराम कोकणे,सचिव रामकृष्ण लांबतुरे, इम्रान सगरी,विजय थोरात,मनोज भालेराव,धीरज शेळके,रवींद्र जोगीपेठकर,शाहनवाज शेख,विक्रम इंगळे,दिनेश मेटकरी,रणजित वाघमारे,नितीन खिलारे आदी उपस्थित होते.
या वेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध प्रवीण नागणे यांची निवड करण्यात आली. संघटेचे कोल्हापूर येथे राज्यव्यापी अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सह स्थानिक खासदार,आमदार व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत यामुळे या अधिवेशनाच्या तयारी बाबत संस्थापक, संपादक राजा माने यांनी मार्गदर्शन केले तसेच येऊ घातलेल्या नवीन ब्रॉडकाष्ट बिलाबाबत चर्चा करण्यात आली. सर्व प्रकारच्या डिजीटल मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी वेळोवेळी योग्य पाठपुरावा करण्यात येईल असे ज्येष्ठ संपादक सतीश सावंत यांनी सांगितले,तर नवीन बदलत्या तंत्रज्ञानाबाबत HPN मराठीचे संपादक नागेश सुतार यांनी माहिती सांगितली.
या प्रसंगी पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, तालुका अध्यक्ष तानाजी जाधव,नामदेव लकडे,भारत शिंदे,गणेश महामुनी,स्वप्नील जाधव,अजित देशपांडे यांच्या सह जिल्हाभरातून आलेले संपादक,पत्रकार उपस्थित होते.