सोबत काँग्रेस कार्यकर्ते अन् उमेदवारी मागणी राष्ट्रवादीकडे ; धर्मराज काडादी यांचे विमान भरकटले का? तर नाही शरद पवारांची ही इच्छा
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या स्वतः शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या फौजी या खान यांनी या मुलाखती घेतल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे खासदार धर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिधेश्र्वर परिवाराचे नेते धर्मराज काढावी यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्यानंतर आता ते दक्षिण मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन गावो गावी फिरत आहेत. बऱ्याच ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांनी विरोध सुद्धा केल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीला ते दिसून आले. तेव्हा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सोबत घेऊन फिरायचे आणि उमेदवारीची मागणी राष्ट्रवादीकडे, काडादी यांचे विमान भरकटले का? असेही टीका काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान अधिक माहिती घेतली असता समजले की, दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काडादी यांनी शरद पवार यांच्यासमोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. शरद पवार यांनी अद्यापही जागा वाटपा मध्ये सोलापूरच्या कोणत्याही मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही दक्षिण सोलापूरचे जागा काँग्रेस अथवा शिवसेनेला सुटली तरी त्या पक्षाकडून काडादी यांनी काहीही करून यावेळी दक्षिणमधून निवडणूक लढवावी अशी इच्छा स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे समजले.