सोलापूर : नवाब मलिक हे तुरुंगातून आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनात सहभागी झाले. नवाब मलिक हे अजित पवार गटात सामील झाल्याने तो विषय दिवसभर चर्चेचा ठरला. या विषयावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
सायंकाळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून स्पष्टपणे सांगितले सत्ता येथे जाते परंतु देश महत्त्वाचा असतो. यावरून नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सहभागी होता येणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे पत्रामध्ये त्यांनी अजित पवार यांना काय लिहिले ते वाचा.