Wednesday, June 25, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 April 2024
in political
0
आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आईचा हात, पत्नीची साथ, जनतेचा आशिर्वाद घेत फडणवीसांनी मतदानाचा हक्क बजावला!

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय. नागपुरातही आज मतदान आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आईसमवेत मतदानाचा हक्क बजावला. फडणवीसांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. फडणवीस आपल्या वृद्ध आईचा हात धरून मतदानकेंद्रात घेऊन जाताना दिसतायेत. फडणवीसांचा राजकारणातला सुसंस्कृतपणा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाने पाहिलाय, पण आज आईसोबतचं फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस सध्या प्रचंड व्यस्त आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभा आणि भेटीगाठींचं सत्र सुरु आहे. महायुतीची महाराष्ट्रातली संपूर्ण कमानच फडणीसांच्या खांद्यावर आहे त्यामुळे फडणवीसांची प्रचारसभा व्हावी अशी महायुतीतल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. फडणवीसांच्या १०० हुन अधिक सभा होणार आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले. त्यांनी मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या फडणवीसांच्या आई यांनी.

राजकीय जीवनात काम करत असताना राजकीय नेत्यांना घर आणि कुटुंबासाठी वेळ द्यायला मिळत नाही अशी तक्रार अनेकदा कुटुंबियांकडून होत असते. परंतु फडणवीसांनी एक वेगळं उदाहरण घालून दिल्याचं बोललं जातंय. मतदानकेंद्रात जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आई आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी त्यांचा हात धरला होता. आधार देत ते आईला मतदानकक्षापर्यंत घेऊन गेले. आईने मतदानाचा हक्क बजावला यातून फडणवीसांनी पक्षासाठीची निष्ठा आणि आईसोबतचं प्रेमळ नातं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दाखल दिला अशी चर्चा सर्वत्र आहे.

Tags: Devendra fadnvisLoksabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

माढ्यातून शेकापची बंडखोरी ; अनिकेत देशमुख यांची माघार, एडवोकेट सचिन देशमुख यांनी भरला अर्ज

Next Post

सहा दशकांतील काँग्रेसकाळाच्या समस्या मोदी सरकारने दहा वर्षांत संपविल्या ; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

24 June 2025
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

24 June 2025
सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

24 June 2025
भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

24 June 2025
उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

24 June 2025
मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

22 June 2025

क्राईम

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1777552
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group