दक्षिणच्या दौऱ्यात प्रणिती शिंदेंचे जोरदार स्वागत ; मोदीजी हिम्मत असेल तर समोरासमोर लढा ; दिले आव्हान
सोलापूर : विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करतात, विरोधी पक्षाचे खाते सिल करतात, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू देत नाहीत, निलंबित करतात, ही लोकशाही आहे की हुकूमशाही असा सवाल करत सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढा असे थेट आव्हान दिले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी दक्षिण मध्ये प्रचार दौरा सुरू केला होटगीमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर त्यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले.
यावेळी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब शेळके, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, अशोक देवकते, राधाकृष्ण पाटील, माजी उपसरपंच असीम शेख, इंद्रजित लांडगे, शिवराज पाटील, काशिनाथ गंगदे, संजय जाधव, पंडित लांडगे, केदार दिंडोरे, जोहर शेख यांच्यासह महिला पदाधिकारी इतर दक्षिण मधील नेते उपस्थित होते.