सोलापूरचे नाव देशात लौकिक करणारा क्रिकेटपटू अरशीन कुलकर्णी याची अंडर-19 वर्ल्ड कप करिता भारतीय संघात निवड झाल्याप्रित्यर्थ व इंडियन प्रीमियर लीग करिता लखनौ संघात निवड झाल्याप्रित्यर्थ राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी त्याच्या इंद्रधनू येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी भाजप शहर मध्य विधानसभा प्रभारी उदय पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, शहर सरचिटणीस रोहिनी तडवळकर, राजाभाऊ माने, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, महादेव गवळी, गिरीश किवडे, संदीप काशीद,ओंकार होमकर आदींची उपस्थिती होती.