Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 January 2025
in top news
0
अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान
0
SHARES
748
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान

सोलापूर : भारतात प्रथमच एका खाजगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे. सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्यादृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद अशी बाब आहे.

बंगळुरुस्थित ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीने हे 3 उपग्रह बनविले आहेत. भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठविण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या ‘इस्रो’ या संस्थेमार्फत पाठविण्यात आले होते. पण नुकतेच दि. 15 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठविण्यात आलेले 3 उपग्रह भारताच्या ‘पिक्सेल’ या खाजगी कंपनीमार्फत पाठविण्यात आले. भारतात खाजगी कंपनीमार्फत उपग्रह पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘पिक्सेल’ कंपनीने अमेरिकेतील प्रख्यात ‘स्पेस एक्स’ या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठविले. या प्रकल्पाकामी पिक्सेल कंपनीची सुमारे 200 टीम कार्यरत होती. यामध्ये या कंपनीमध्ये प्रॉडक्शन इंजिनिअर या क्रमांक दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचे योगदान आहे. या कंपनीचे संस्थापक अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे असून सन 2019 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. राजस्थानमधील बिट्स, पिलानी येथे बी. ई. (मेकॅनिकल) तसेच फ्रान्समध्ये एरोस्पेस इंजीनिअरिंग मध्ये एम.एस. केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन 2022 मध्ये या कंपनीत प्रॉडक्शन इंजिनिअर यापदी रुजू झाले. अवेस अहमद व क्षीतिज खंडेलवाल हे नीरज यांचे बिट्स, पिलानी येथील बॅचमेट आहेत, हे विशेष.

नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉप ॲक्ट कन्सलटंट व अश्विनी सहकारी रुग्णालयाचे माजी संचालक रामचंद्र गाडी यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव आहेत. पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रॉडक्शन इंजिनिअर या नात्याने उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे 50 जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केले. नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले. उपग्रह बनविल्यावर कॅलिफोर्निया येथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटशी उपग्रहांची जुळवाजुळवही केली.

हे तीनही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आले, ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले.

एकंदर नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूरसाठी भूषणावह मानले जात आहे. याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Tags: Niraj gadiScientistSolapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महानगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा ; जुळे सोलापूरकर संतापले

Next Post

राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

राष्ट्रवादी नेते तौफिक शेख यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी यशस्वी ; चार ब्लॉकेज निघाले

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998444
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group