सात नंदीध्वजांची पूजा करीत सुशील बंदपट्टे यांनी साजरा केला वाढदिवस
सोलापूर : काँग्रेसचे युवा नेते, चार्टर्ड अकाउंटंट सुशील बंदपट्टे यांनी आपला वाढदिवस ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रेतील सराव नंदीध्वजांचे पूजन करून साजरा केला.
बंदपट्टे यांच्या निवासस्थानी फुलांनी नंदीध्वज सजविण्यात आले होते. त्यानंतर श्री सिध्देश्वर महाराजांच्या प्रतिमेेचे पूजन करून आरती करण्यात आली. पूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


याप्रसंगी माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रथमेश कोठे तसेच शिवजन्मोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, तसेच वडार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान वाढदिवसानिमित्त सी.ए. बंदपट्टे यांचा उपस्थितांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.