Monday, June 16, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राम सातपुते व देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 April 2024
in Election
0
राम सातपुते व देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
0
SHARES
189
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राम सातपुते व देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

 

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाटी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धीतने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे.

हे पण वाचा : मोची समाज झाला राम सातपुते यांच्या विरोधात आक्रमक

आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का? असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे, फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

 

 

Tags: Devendra fadnvisLoksabha election 2024MLA Ram satputeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचा ‘आम आदमी ‘ काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या सोबत

Next Post

सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’ ; काय आहे ही न्यूज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’ ; काय आहे ही न्यूज

सोलापुरकरांसाठी मोदी सरकारचे ‘‘समर गिफ्ट’’ ; काय आहे ही न्यूज

ताज्या बातम्या

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025
‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

15 June 2025
‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

‘कुलकर्णी द पॉवर ‘ पालकमंत्र्यांच्या हस्ते व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला सन्मान

15 June 2025
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा

14 June 2025
प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

प्रभाग २२ येथील यतिमखाना परिसरात रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

14 June 2025
सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

14 June 2025
सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

14 June 2025
ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

13 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1759460
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group