अभिनंदन ! जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा विशेष सत्कार
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी लाडकी बहिण योजनेचे अतिशय उत्कृष्ठ नियोजन केले असून जिल्ह्यात महिला सक्षमीकरण च्या सर्व योजनेत मिळून एकूण 23 लाख 33 हजार लाभार्थी महिलांना याचा लाभ मिळवून दिला आहे.
तसेच इतर प्रशासकीय कार्यक्रमाचे दोन वेळा प्रभावी नियोजन केल्या बदल तसेच आजच तिर्थ दर्शन योजनेतील लाभार्थी साठी विशेष रेल्वे आयोध्या साठी रवाना केल्या मुळे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांचा आज विशेष सत्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे हस्ते करण्यात आला .या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशोगाथा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.