सर फाउंडेशनच्या नागरी सत्काराने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी भारावले ! महिलांना पुरस्कारासह विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण उत्साहात
सोलापूर : राज्यात शैक्षणिक क्षेत्रात इनोव्हेटिव्ह उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांच्या सर फाउंडेशन या संस्थेने सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा नागरी सत्कार केला. या सत्काराने जिल्हाधिकारी स्वामी हे अतिशय भारावून गेले होते.
स्टेट इनोव्हेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यावतीने सर जीनियस एक्झाम परीक्षेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच जागतिक महिला दिनाच्या साधून उत्कृष्ट महिला शिक्षिकांचा गौरव समारंभ शनिवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा, सकाळचे संपादक अभय दिवाणजी डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, राज्य समन्वयक बाबासाहेब वाघ, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, डॉ समीना नदाफ, राज्य महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, समन्वयक सिद्धाराम माशाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी दिलीप स्वामी यांनी महिला शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले, आपण केवळ आठ मार्च हाच दिवस महिला दिन म्हणून साजरा करतो परंतु प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो. प्रत्येक घरातील महिलेचा सन्मान झालाच पाहिजे असे सांगताना त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कामकाज करताना राबवण्यात आलेले उपक्रम संकल्पना या राज्य शासनाने स्वीकारल्या त्याचा अतिशय आनंद होतोय. अडीच वर्षाच्या सीईओ पदाच्या कार्यकाळात आपण जिल्ह्यात सुमारे 22 कोटी रुपये लोक सहभागातून जमा करून स्वच्छ व सुंदर शाळा, सायकल बँक, दवाखाने स्वच्छ सुंदर, पशुसंवर्धनच्या दवाखाने सुंदर केले. शिक्षकांनी गुणवत्ता वाढ, संस्कारक्षम, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे डॉक्टर शहा यांनी सर फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सर फाउंडेशन आणि शिक्षकांच्या मदतीने प्रिसिजन फाउंडेशनने राबवलेल्या उपक्रमांची माहिती शहा यांनी दिली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नर्मदा मिठ्ठा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक राजकीरण चव्हाण, अनघा जहागीरदार, विजयकुमार वसंतपुरे, जिल्हा समन्वयक नवनाथ शिंदे, सर जिनीअस एक्झाम समन्वयक पैगंबर तांबोळी, उस्मानाबाद समन्वयक गुणवंत चव्हाण,
तालुका समन्वयक ज्योती कलुबर्मे, रवी चव्हाण, कल्पना घाडगे, संतोष कुलकर्णी, विद्या वर्डुळे, शागुप्ता शेख, मनीषा पांढरे त्यांनी परिश्रम घेतले.