सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस सोलापूर शहरासह ग्रामीण भागात यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात तर वाढदिवस कार्यकर्ते साजरा करतातच मात्र यंदा ग्रामीण भागात सर्वाधिक उत्साह दिसला. त्याला कारण हे तसेच होते. जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी यंदा लक्ष घातल्याने आणि ग्रामीण भागात वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
याच अनुषंगाने सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच 51 हजार रुपये बक्षीस असलेली लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळवली गेली. ही स्पर्धा योग्य नियोजन केल्याने उत्तमरीत्या पार पडली. या स्पर्धेत मॉडेल क्रिकेट क्लबने विजेतेपद मिळवले दिपक सीसी क्रिकेट संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष नरोटे यांनी सुरेश हसापुरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. आपल्या नेत्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा हे कार्यकर्त्यांनी सुरेश हसापुरे यांच्याकडून शिकावे असे म्हणून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.