सोलापुरातील लिंगायत धर्मगुरूंचे आशीर्वाद ; प्रणिती शिंदे खासदार होतील ; सुशीलकुमार शिंदे भेटीला
सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नेत्यांच्या गाठीभेटीवर भर देत आहेत. तर प्रणिती शिंदे या थेट मतदारांच्या संपर्कात जात आहेत.
दरम्यान सोलापुरातील लिंगायत समाजाचे धर्मगुरू तथा भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु ईश्वरानंद आप्पाजी यांनी मात्र सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या खासदार होतील असा आशीर्वाद दिल्याची माहिती मिळाली.
अधिक माहिती घेतली असता समजले की, गुरुवारी सायंकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट येथे मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी यांचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले,
या मठामध्ये इतर वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कर्नाटक राज्यातील अनेक मंत्री येऊन आशीर्वाद घेतात परंतु अचानक देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भेट दिली यावेळी मठाचे संस्थापक आणि मठाधीश यांनी माजी शिंदे यांचा सन्मान करून या लोकसभा निवडणुकीत पर्यंत शिंदे या असा आशीर्वाद दिल्याचे समजले. याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे, सीए सुशील बंदपट्टे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.