भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लोकसभा महाविजय प्राप्त करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून संघटनात्मक दौरा करत असून बुधवार 6 डिसेंबर रोजी धाराशिव दौरा संपवून त्यांचे सोलापूरात आगमन होणार आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरातील प्रदेश पदाधिकारी यांनी शहरातील विविध भागात स्वागताचे बॅनर,कमान व स्वागताच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली आहे.
7 डिसेंबर रोजी शहरात विविध संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती OBC प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील,प्रदेश कार्यकारणी सदस्त हेमंत पिंगळे,अमर बिराजदार,SC मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे,OBC मोर्चाचे,यतीराज होनमाने,कामगार आघाडीचे नागेश पासकंटी आदींनी दिली.