राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या महायुतीने एक मोठी जबाबदारी दिली आहे. नांदेड जिल्हा महायुती मुख्य मार्गदर्शक तथा नांदेड जिल्हा पालक प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महायुती समन्वय समितीने लोकसभा निवडणूकी डोळयासमोर ठेवून महाराष्ट्रातील ३६ विभागीय जिल्हयामध्ये रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी महायुतीचे मेळावे आयोजित करण्याचे ठरविले आहे.
त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व खासदार राहुल शेवाळे नेते व समन्वयक शिवसेना यांच्या मार्गदर्शनानुसार यांना नांदेड या जिल्हयात पालक म्हणून जावयाचे असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.