Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!

सुशीलकुमार शिंदे यांच्यावर स्पेशल राजकीय रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 May 2024
in political
0
बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!

Oplus_131072

0
SHARES
923
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाप तो बाप रहेगा…..! बाप तो बाप रहेगा…..!

सोलापूर : 2024 ची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी लक्षात राहणारी असेल. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या ऐवजी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणूक लढवत आहेत. निवडणूक जाहीर होण्याच्या दोन महिने अगोदरपासूनच प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार सुरू केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील सुमारे साडेचारशे गावांमध्ये त्या पोहचू शकल्या आहेत. या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी बाप म्हणून आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीर अशी भूमिका बजावली आहे.

2014 आणि 2019 या लोकसभेच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा झालेला पराभव, त्यांनी तितक्याच ताकतीने पचवला. दहा वर्षानंतर महाराष्ट्रात भाजपा विरोधी एक प्रकारे लाट तयार झाली. आमदार प्रणिती शिंदे यांनी यंदा काहीही करून वडिलांच्या दोन पराभवांचा बदला घ्यायचा हे ध्येय मनात ठेवून निवडणुकीच्या मैदानात त्या उतरल्या आहेत. काँग्रेसला वाटते तितकी ही लोकसभा निवडणूक सोपी नाही हे सुशीलकुमार शिंदे जाणून आहेत.  त्यामुळे ते सोलापुरातच तळ ठोकून आहेत. शिंदे यांचा पूर्वीपासूनच सोलापुरातील सर्व समाज, सर्व राजकीय पक्ष यांच्यासोबत असलेले चांगले संबंध यंदा त्यांच्या कामाला येत आहेत.

छोट्याशा ढोर समाजातून आलेले सुशीलकुमार शिंदे सोलापुरात कायमच सर्वधर्मसमभाव जपत आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील मराठा समाज, ब्राह्मण समाज, पद्मशाली समाज, लिंगायत समाज, धनगर समाज, मोची समाज, आंबेडकरी समाज, ख्रिश्चन समाज, लोधी समाज, भटका विमुक्त समाज,  मुस्लिम समाज या सर्वांमध्ये सुशीलकुमार यांची लोकप्रियता आजही टिकून आहे.

या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा असते त्या सोबतच सुशीलकुमार शिंदे यांची सुद्धा स्वतःची प्रचार यंत्रणा त्यांनी तैनात ठेवली आहे, या निवडणुकीत बापलेक दोघे मिळून काँग्रेस पक्षाचा प्रचार करीत आहेत. एकीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्यात अनेक राजकीय खेळ्या करत आहेत, तोडा, फोडा आणि जोडा असे राजकारण भाजपचे एकंदरीत पाहायला मिळते पण राजकारणातील अनुभवी, राजकीय डावपेच माहीत असणारे, शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा काही कमी नाहीत त्यांनीही भाजपमधील नाराजांना आपल्याकडे आणण्यात यशस्वी भूमिका पार पाडली आहे.

भाजप यावेळी हिंदुत्ववादाचा मुद्दा जाणीवपूर्वक आणि तितक्याच आक्रमकतेने  उपस्थित करू लागला आहे, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद यावरून सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे. परंतु त्या आरोपांना उत्तर देताना शिंदे आपली मानसिकता ढळू देत नाहीत, सर्वधर्मसमभाव जपण्याचे काम ते कायम करीत आलेले आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांच्यावर भाजप करीत असलेल्या टीकेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारल्यावर ते म्हणतात “बाप हा बापच असतो, बापाला कुणी आव्हान द्यायचं नसतं !

Tags: @sushilkumar shindeLoksabha election 2024Loksabha electionsMLA praniti ShindeRahul Gandhi
SendShareTweetSend
Previous Post

ॲड.अमित आळंगे यांनी मारली बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी बाजी ; विक्रमी मते घेऊन विजयी

Next Post

माने, हसापूरे, शेळके, मिस्त्री एकत्रित दौरा ; दक्षिण मधून प्रणिती शिंदेंना 25 हजाराचा लीड देणार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791593
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group