बाई बब्रुवान कटारे यांचे निधन
सोलापूर : हद्दवाढ मधील ताई चौक भागातील ललिता नगर येथील रहिवासी बाई बब्रुवान कटारे वय 75 यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रशांत कटारे यांच्या त्या चुलती होत्या.
त्यांची अंत्ययात्रा ललिता नगर येथील राहत्या घरातून शनिवारी सकाळी दहा वाजता निघून त्यांच्यावर अक्कलकोट नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.